top of page
Vivek01 (1).jpg

विलास जालिंदर दिवेकर

   Founder
(BE. Mechanical     Engineer, 1993 , Pune University)

विलास जालिंदर दिवेकर , सर्वांचे बापू. वरवंड गावातील एका प्रतिष्ठित अश्या दिवेकर कुटुंबात बापूंचा जन्म झाला. 1990 च्या दशकात  BE, Mechanical engineer ही पदवी संपादन करून अभियंता क्षेत्राला सुरुवात झाली. यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असलेल्या बापूंनी Mechanical व्यतिरिक्त इतरही क्षेत्रात कामे केली. Electronic, Notebook Manufacturing, Logistics अश्या विविध व्यवसायात हात घालत आपले नशीब अजमावून पाहिले .या प्रवासात बापूंना अनेक जिवाभावाचे मित्र ही भेटले. त्यातीलच एक उत्तम मित्र नरहरी रामचंद्र चौगुले (BE , Electronics Engineer ,1993 ,  Pune University ) . नरहरी दादांसोबत बरीच वर्षे बापूंनी  hilo-Tech automation ही Electronic ची कंपनी भागीदारीत चालवली. पुढे २००५ मध्ये बापूंनी विवेकानंद दिवेकर अँड असोसिएटस् नावाने व्यवसाय सुरू करत बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. आणि व्यावसायिक म्हणून नवीन आणि मोठी ओळख बनायला सुरू झाली. बांधकाम क्षेत्र बापुंसाठी भाग्यशाली ठरले. यात बापूंनी असंख्य प्रकल्प ज्यात Residential, Commercial, Industrial, Institutional projects पूर्णत्वास नेले आणि दौंड तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बनले . विवेकानंद दिवेकर अँड असोसिएटस् ची पायाभरणी याच काळात झाली. बापुंसारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि कुशल व्यावसायिकाने १ जानेवारी २०१५ साली जगाचा निरोप घेतला.

विवेकानंद विलास दिवेकर

   Co-Founder
(BE. Civil    Engineer,  BA. Psychology, MA. Clinical    Psychology)

विवेकानंद दिवेकर यांनी BE, Civil Engineer ची पदवी घेतली . २०१४ नंतर विवेकानंद यांनी व्यवसायाची धुरा सांभाळत व्यवसायाला नवी उभारी दिली . Design क्षेत्रात जास्त रस असलेले विवेकानंद  यांनी पुढे Architecture & Structural Designing , Technical Consultancy , Interior design , On-site Cosultancy ,  वास्तू शास्त्र , या क्षेत्रामध्ये 6 वर्षात 500 हुन अधिक प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा विक्रम नोंदविला. Commercial, Government, Residential, अश्या अनेक प्रकल्पांवर त्यांनी आपल्या डिझाईन शैलीने सुंदरतेची मोहोर उमटवली . इतकचं नाही तर त्यांनी डिझाईन केलेल्या प्रकलपांचे खासदार सुप्रिया ताई सुळे यांसमावेत अनेक दिगज्जांनी देखील कौतुक केले आहे .

सन २०२२ मध्ये  " वरवंड गावातील आदर्श युवा उद्योजक हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. " मुळात जिद्द आणि चिकाटी या गोष्टीचे बाळकडू असलेले विवेकानंद यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत यशाची वाटचाल सुरूच ठेवली आहे. दहावीपासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्युटर डिझाईन क्षेत्रात काम करत करत  वयाच्या  २१ व्या वर्षी मोठी जबाबदारी अंगावर घेत आज व्यवसायाला इतकं मोठं करून विवेकानंद यांनी तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. सध्या विवेकानंद दिवेकर अँड असोसिएटस् मध्ये २० हून अधिक Civil Engineers , Architect , Interior Designer आणि वास्तुशास्त्रज्ञ कार्यरत आहेत .

_W4A7252_edited.jpg
SOCIAL BAR
  • Instagram
  • Facebook
  • Whatsapp
  • Youtube
  • Pinterest

©2023 by Vivekanand Divekar. 

Office 1- Vivekanand Divekar & Associats, Shop No -4 , Behind Shree Multi Speciality Hospital, Pune Solapur Highway, Chaufula ( Kedgaon ) .

Office 2- Vivekanand Divekar & Associats, Mangaldip Heights , Near AM College , Hadapsar , Pune .

bottom of page